सौन्दड येथील प्रकार, पूर्व सूचना न देता विधुत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा.
1 min read
पशुवैद्यकीय दवाखाना सौन्दड येथील विज बिल भरूनही वीज कापल्याचा आरोप.
गोंदिया,सडक अर्जुनी, दिनांक – 30 ऑक्टोबर 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथील वीज बिल भरूनही वीज कापण्याचा प्रकार 29 रोजी समोर आला आहे. पशुवैद्यकीय दवाखाना हा अति आवश्यक सेवा अंतर्गत येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची लेखी पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, विज बिल भरल्याचे सांगून सुद्धा वीज जोडनी करिता विनंती करण्यात आली, यावर विधुत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पैसे भरण्यात यावे तेव्हा वीज जोडण्यात येईल असे डॉक्टरांना सांगितले.

पशुवैद्यकीय दवाखाना अति आवश्यक सेवांमध्ये येत असून सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून विद्युत पुरवठा खंडित केलेला असून औषधी साठा खराब झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल होत आहे, मात्र पशुधन अधिकारी कार्यालय आता अंधारात राहावे लागते की, काय अशी परिस्थिती दिसत आहे.
विज बिल भरूनही अंधारात राहण्याची पाळी आता पशुधन अधिकारी कार्यालयाला आली आहे, संबंधित वीज वितरण अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी पशुधन अधिकाऱ्यांनी केली आहे.
????डॉक्टर रोशन अडरस्कार, सौन्दड-
अति आवश्यक सेवा अंतर्गत येत असलेले संस्थांचे विद्युत खंडित करण्याबाबतचे शासकीय परिपत्रक असल्यास देण्यात यावे किंवा लेखी पूर्व सूचना देऊन विद्युत खंडित करण्यात यावे मात्र तसे होत नसून सरसकट विधुत पुरवठा कापण्याचा सपाटा विधुत विभागाने लावला आहे, त्या मुळे अश्या अधिकाऱ्यांवर कार्यवाई झाली पाहिजे.
????इंजी. राहुलदेव मळावी, सौन्दड mscb कार्यालय –
वीज बिल भरल्यानंतर विधुत पुरवठा तात्काळ चालू केला आहे, आम्हाला जे आदेश आहेत, त्यावर काम चालू आहे, प्रत्येक महिन्याचा बिल भरणे आवश्यक आहे, अन्यथा विधुत पुरवठा खंडित करण्याचे आदेश वरून आहेत, त्यांच्याकडून कोणताही वीज जोडणी चार्ज वसूल केला नाही.