ओबीसींनी हक्कसाठी एकत्र यावे -आ चंद्रिकापुरे
1 min read

गोंदिया,अर्जुनी मोरगाव,11 ऑक्टोबर 2021-बहुजन समाजाच्या सर्वात मोठा घटक असलेल्या ओबीसी समाज घटनादत्त न्याय अधिकारापासून वंचित आहे.राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेले 340 कलम असून सुद्धा त्याचे लाभ ओबीसी घटकाला भेटणे आवश्यक आहे. सध्या ओबीसी मुद्दा ऐरणीवर आहे, परंतु ओबीसींची जनगणना होणे अत्यावश्यक असल्याने ओबीसींनी हक्कासाठी एकत्र यावे.राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सोबत असल्याचे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल द्वारे अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जूनी मोरगाव येथे 9 ऑक्टोबरला घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे, मार्गदर्शक गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राकेश लंजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, ओबीसी जिल्हा समन्वयक रमेश चूरहे, महिला सेलचे जिल्हाउपाध्यक्ष मंजूताई डोंगरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे ,सचिव सचिव उद्धव मेहंदळे, राकेश जायस्वाल ,जिल्हा महासचिव डॉ श्यामकांत नेवारे, बंडूभाऊ भेंडारकर, अमर ठवरे इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे याप्रसंगी म्हणाले कि ओबीसींनी आता शिक्षणाची कास धरणे गरजेचे असून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ओबीसींना शिक्षण यामध्ये सक्रिय व्हावे ओबीसींना संख्येच्या तुलनेत घटनादत्त वाटा मिळण्यासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी ओबीसी च्या सोबत असल्याचे ते म्हणाले. यावेळी किशोर तारोणे व इतरांनाही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश लंजे यांनी केले, उपस्थितांचे आभार डॉ. दीपक रहिले यांनी केले कार्यक्रमाला योगेश नाकाडे,चंदु नाकाडे, भोजराम रहिले, मोरेश्वर रहीले, ललित नाकाडे, राजेंद्र वाढाई, रमन डोंगरवार ,योगेश हलमारे, माधुरी पिंपळकर, दीपक सोनवणे इतर उपस्थित होते