BREAKING NEWS – पांढरी येथील राईस मिल मालकाने मिल्ट्री जवानाला केले मारहाण…

गोंदीया, सडक अर्जुनी, दिनांक – 04 ऑक्टोबर 2021 – आज दुपारी 12 वाजता ग्राम पांढरी येथील मित्तल राईस समोर तांदळाचे वाहन उभे अशल्यावरून वाद निर्माण झाला, परिणामी राईस मिल धारकांनी मिल्ट्री जवान महेश श्रीराम कोहळे वय 32 वर्षे मु. पांढरी असे आहे, आरोप आहे की मिल मालकांसह तब्बल 10 लोकांनी सदर वेक्तीचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यातच मिल्ट्री जवानाला मिल मध्ये दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे,
घटनास्थळी पांढरी येथील शेकडो नागरिक उपस्थित होती, तक्रार धारक डुग्गीपार पोलीस स्थानकात सदर प्रकरणाची रीतसर तक्रार करणार असल्याचे दरम्यान सांगत होते, पांढरी येथील राईस मिल मध्ये बाहेर राज्यातून अवेध तांदूळ येत असल्याने सदर वाहन मुख्य मार्गावर लावली असतात त्या मुळे मुख्य मार्गावर वाहनाचे नेहमीच अतिक्रमण असते त्या मुळे प्रवाश्यांना अपघाताची शक्यता असते,व अपघात सुद्धा झालेले आहे, करिता या विषयावर बोलणाऱ्या मिल्ट्री जवानाला बेधम मारहाण केल्याचा आरोप आहे.