राका; गांधी जयंती औचित्य साधून 75 व्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्त डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे वाटप.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी, राका,02 ऑक्टोबर 2021- ग्रामपंचायत राका येथे गांधी जयंती औचित्य साधून 75 व्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्त डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे वाटप, सडक अर्जुनी तहसील कार्यालया अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राका येथे आज दिनांक 2 ऑक्टोबरला १ वाजता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली . तसेच 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२’ सातबारा देण्याच्या विशेष मोहीम शुभारंभ करून ७/१२वितरीत विनामूल्य देण्यात आले. याबाबत माहिती देण्यात आली .या कार्यक्रमा प्रसंगी मा. श्री वाघधरे तलाठी सौंदड ,मा राजेश रामटेके सरपंच, राका मा.मधुसूदन सोमा दोनोडे उपसरपंच राका ,मधुकर मेंढे माजी सरपंच ,मा.सुधीर शिवणकर, मा. शंकर मेंढे , तसेच ग्रामपंचायत सदस्य , प्रतिष्ठित नागरिक व गावातील शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.