बेपत्ता पतीचे मृतदेह मिळाल्याने पत्नीने सखोल चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

गोंदिया,(विशेष प्रतिनिधी),24 सप्टेंबर 2021 – गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील हलबिटोला (तेढा) येथील रहिवाशी मनीषा दीपक भोयर यांचा (पती दिपक इंदर भोयर वय २५ वर्ष ) दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ ला घरून बेपत्ता झाला होता.
ती तक्रार पोलिस स्टेशन गोरेगाव ला दिली होती. पण दि. ०६ सप्टेंबर २०२१ ला सकाळी ०७ वाजता पतीचा मृतदेह तलावामध्ये मिळाले.
गोरेगाव पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता प्राथमिक अहवाल नोंदणी करून कारवाही केली.
परंतु मृत पती ची पत्नी मनीषा हे पोलिसांच्या कार्यवाही पासून असंतुष्ट आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, गोरेगाव पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केली नाही.
माझ्या पतीला घरून ओमकार नाईक यांनी बोलावून नेले?, तसेच ओमकार नाईक यांच्या सोबत जे जे गेले होते आणि माझ्या पती सोबत होते?, असे मनीषा यांचे प्रश्न आहेत. या सर्वांची चौकशी गोरेगाव पोलिसांनी केली नाही म्हणून या सर्व प्रकरणाची व सामील सर्वांची सखोल चौकशी व्हावी अशी मनीषा दीपक भोयर यांची याचना आहे.
करिता, यासाठी हे पत्र मनीषा भोयर यांनी पोलीस अधीक्षक जिल्हा गोंदिया, काँग्रेस कमिटी जिल्हा गोंदिया, तहसील कार्यालय गोरेगाव, तिरोडा/गोरेगाव विधानसभा अध्यक्ष, तसेच सोशल मीडिया काँग्रेस कमिटी व सर्व पत्रकार बंधू यांना दिले आहे.
सदर प्रकरणात काय काय खुलासे समोर येतील, पोलीस योग्य चौकशी करून खरं काय ते जनतेसमोर आणतील का.. याकडे सर्व गाववासीयांचे लक्ष लागून आहे.