सायकलच्या हॅण्डल वर लटकलेल्या पैश्याची पिशवी जबरदस्तीने नेले चोरून.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी,19 सप्टेंबर 2021- प्रकरण अशे आहे की , 18 सप्टेंबर रोजी 4 वा. दरम्यान, परसोडी आरोग्य केंद्र समोर डांबरी रोडवर खेमचंद रुपचंद राणे वय 53 वर्ष. रा. डोंगरगाव/ख, ता – स/अर्जुनी, जिल्हा – गोंदिया , हे विक्री केलेल्या धानाचे 53790/- रुपये को ऑपरेटिव्ह बॅंकेतून विड्राल करून कथ्या रंगाच्या पिशवीत टाकून सायकलच्या हॅण्डल ला लटकवून स्वगावी परसोडी मार्गे डोंगरगाव येथे जात असताना पारसोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर गोंदिया ते कोहमारा डांबरी रोडवर गोंदिया कडून येणाऱ्या निळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकल वर मागे बसलेल्या इसमाने सायकल च्या हॅण्डल वर लावलेली कथ्या रंगाची पैश्याची पिशवी जबरदस्तीने खीचून स/अर्जुनी कडे गेल्याची रिपोर्ट खेमचंद ने दिली सदर गुन्ह्याचा तपास सपोनी पांढरे पोलीस स्टेशन द डूग्गीपार हे करीत आहेत.