ग्राम गोंगले येथे मा.आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिनेश साउस्कार यांच्या घरी दिली सदिच्छा भेट.
1 min read
गोंदिया-घरकुल योजना अंतर्गत घरकुल साठी शासना तर्फे 1.50 लक्ष रुपये मंजूर झाले.परंतु घर अधिक चांगले विस्तृत रित्या बांध काम व्हावे यादृष्टीने घरच्या लहान मोठे सर्व सदस्यांनी स्वतः मेहनत करून घरचेच कामावर मजुरी करून अतिशय प्रशस्त घरकुलाचे बांधकाम स्वतःचे एकही पैसा न लावता शासनाने दिलेल्या अनुदानानेच संपूर्ण घराचे बांधकाम केले.
त्यांचे परिश्रम बघून आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी साउस्कार कुटुंबांचे अभिनंदन केले.
त्यावेळेस ग्राम गोंगले चे सरपंच डी. यू. रहांगडाले, एफ.आर टी शहा, आशा दिनेश साउस्कार, सुकाराम आत्माराम साउस्कार, रेवन बाई साउस्कार ,मुकुल दिनेश साउस्कार, निवृत्ती साउस्कार उपस्थित होते.