महावितरण चे वायर चोरण्या चा प्रयत्न करण्यावर गुन्हा दाखल.

औरंंगाबाद वृत्तसेवा 10 सप्टेंबर 2021 : खांबावरील लघुदाब वाहिनीची वायर चोरुन नेण्याचा चौघांनी प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास उघडकीस आला. महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश वाहुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लघुदाब वाहिनीला छेडछाड केली.
यावरून शाहेबाज मोईन खान, अरबाज मोईन खान व त्यांच्या दोन साथीदारांविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत दुकानाचे शटर उचकटून चोरांनी घड्याळ, अंगठी आणि पाकिट अशा ४० प्रकारच्या वस्तू लांबविल्या.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री शहागंजातील हवेलीवाला कॉम्पलेक्समध्ये घडली. अब्दुल आदील कादरी अब्दुल अजीम कादरी (वय ३७, रा. नवाबपुरा, राजाबाजार रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती एका न्यूज पोर्टल ने दिली.