सौंदड येथे शिक्षकदिनी सेवा निवृत्त्त शिक्षक व कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी 05 सप्टेंबर 2021- भारताचे द्वितीय राष्ट्रपती दिवंगत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून आज 05/09/2021 ला शिक्षक दिनानिमित्त, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सौंदड व मित्र परिवार तर्फे उत्तम नागरिक घडविणाऱ्या,शिक्षण सेवेत उत्कृष्ट कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन तसेच कोरोना महामारीच्या काळात गावात लोकामध्ये जनजागृती, लॉकडाऊन मध्ये सहकार्य, कोरोंटाईन करीता मदत करणे,सामाजिक अंतर पाळणे,ताप आल्यास रुग्णाला रुग्णालयात नेण्यास मदत करणे,लसीकरण करण्यास प्रोत्साहित करणे इत्यादी कार्य उत्तमपणे पार पाडणाऱ्या सौंदड येथील डॉक्टर,नर्स,आंगणवडी सेविका,आशा वर्कर,शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांचा मा.आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आमदार मनोहर चंद्रिकापुरे,अध्यक्ष मा.जी.प.स.रमेश चुऱ्हे, प्रमुख अतिथी गंगाधर परशुरामकर मा.जि.प. सदस्य,प्रभुदयाल लोहिया,मा.जि.प.स., मंजुताई चंद्रिकापूरे,से.नि.प्रा., एफ.आर.टी.शहा उपाध्यक्ष अल्प संख्यांक गोंदिया जिल्हा,मंजुताई डोंगरवार माजी प.स सदस्य,शुभांगीताई वाढवे,अर्चनाताई जांभुळकर ,सचिन लोहीया ग्रा.प.सदस्य,इरलेताई, ओमकारजी इरले ग्रा.प. सदस्य, इकबाल शेख, भजनदास बडोले, नलीराम चांदेवार, राहुल यावलकर, सुखदेव कोरे,व मान्यवर तसेच सौंदड येथील गावकरी उपस्थित होते.
